#ASD | Aai Saptashrungi Devi | भक्तीचा पुन्हा एकदा शुभारंभ 🙏 | Re-Start Devotional Journey

जय माता दी 🙏
नमस्कार मित्रांनो मी राज रघुवीर जोशी, आई सप्तशृंगी देवीचा एक साधा भक्त.

सन 2022 साली, आई सप्तशृंगी देवीच्या कृपा आशीर्वादाने “आई सप्तशृंगी देवी” हे YouTube चॅनेल सुरू केले.

या चॅनेलच्या माध्यमातून आपल्या पर्यंत आईचे दैनंदिन दर्शन, सप्तशृंगगडाशी संबंधित माहिती, आणि आईच्या भाविकांसाठी उपयुक्त असे ७० पेक्षा अधिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

🌸 थोडा थांबा… पण भक्ती कायम....

मित्रांनो काही कारणांमुळे गेल्या काही काळात आपल्या आईची माहिती, दर्शन व सप्तशृंग गडावरील कोणतीही माहिती तथा चॅनल वर कोणताही व्हिडिओ अपलोड करता आले नाही तथा झाले नाही.

मात्र, आईवरील श्रद्धा आणि भक्तीचा प्रवास कधीच थांबलेला नव्हता.

आज, आई सप्तशृंगी देवीच्या कृपेने, हा भक्तीमय प्रवास पुन्हा नव्या उत्साहाने सुरू करत आहे.

🔱 या चॅनेलवर तुम्हाला काय मिळेल?

या YouTube चॅनल, ब्लॉगवर (Blog) टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम पेज व फेसबुक पेज यासारख्या विविध माध्यमाच्या वतीने तुम्हाला नियमितपणे श्री भगवती राजराजेश्वरी, त्रिगुणात्मक स्वरूपिनी, आईसाहेब आई सप्तशृंगी देवी देवीचे दर्शन, सप्तशृंग गडावरील माहिती आणि बरच काही तुम्हाला येथे मिळेल — तर काय काय माहिती मिळेल...?

🙏 आई सप्तशृंगी देवीचे दर्शन
🏔️ सप्तशृंगगड परिसराची सविस्तर माहिती
🛣️ घाट मार्ग व पायवाटेची माहिती
🌿 सह्याद्रीचे निसर्गसौंदर्य
📢 भाविकांसाठी उपयुक्त व महत्त्वाच्या अपडेट्स
🌼 सण-उत्सव असो वा सामान्य दिवस
📿 नवरात्र उत्सव, चैत्र उत्सव, मासिक पौर्णिमा, दैनंदिन त्रिकाळ आरती, महापूजा, विशेष पूजा किंवा एखादा सामान्य दिवस…

आईचे दर्शन आणि आवश्यक माहिती इथे सातत्याने दिली जाईल.

हा चॅनल, ब्लॉगवर (Blog) टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम पेज व फेसबुक पेज यासारख्या विविध माध्यमाच्या वतीने तुम्हाला फक्त माहितीपुरता नाही, तर आईशी जोडलेली एक भक्तीची नाळ आहे.

🙏 आपला आशीर्वाद आणि साथ आवश्यक

आपले प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंबा असाच कायम राहू द्या.

आई सप्तशृंगी देवीचा आशीर्वाद आपण सर्वांवर सदैव राहो.

जय आई सप्तशृंगी देवी 🙏
जय माता दी!
जय अंबे...!

👉 YouTube चॅनेल Subscribe करा
👉 Blog Follow करा
👉 हा लेख इतर भक्तांसोबत Share करा


धन्यवाद
जय अंबे 🌺
आई सप्तशृंगी भक्त आणि आपला
राज रघुवीर जोशी....

Comments

Popular posts from this blog