Posts

Showing posts from December, 2025

#ASD | POV: जेव्हा शब्द थांबतात आणि श्रद्धा बोलू लागते | सप्तशृंगगडावर पोहोचल्यावरचं समाधान...

Image
POV : आई सप्तशृंगीच्या दर्शनाचा अविस्मरणीय क्षण... नमस्कार मित्रांनो मी राज रघुवीर जोशी तुमचे स्वागत करतो आजच्या विशेष व एक छोट्या व्हिडिओच्या माहितीचे काही क्षण आपण आज पाहणार आहोत. आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांतता देणारे क्षण फारच दुर्मिळ झाले आहेत. अशा वेळी केवळ १५ सेकंदांचा एक छोटासा POV व्हिडिओ देखील मनाला गहिवरून टाकतो मनाला स्पर्श करून जातो. हा व्हिडिओ पाहताना असे वाटते, जणू आपण स्वतःच त्या क्षणी आई सप्तशृंगी देवीच्या आणि तिच्या पावन नगरीत / सान्निध्यात उभे आहोत. POV म्हणजे नेमकं काय? POV (Point of View) म्हणजे एखादा अनुभव तुमच्या नजरेतून दाखवणे. प्रेक्षक फक्त व्हिडिओ पाहत नाही, तर तो क्षण स्वतः अनुभवतो. म्हणूनच POV व्हिडिओ आज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहेत. १५ सेकंद… पण अनुभव अमर हा व्हिडिओ जरी फक्त १५ सेकंदांचा असला, तरी त्यात वापरलेल्या छोट्या क्लिप्स खूप काही सांगून जातात. – डोंगरातील शांत वातावरण – नैसर्गी सौंदर्य – मंदिराचा पवित्र परिसर – श्री भगवतीचे दर्शन – मनाला स्पर्श करणारा भक्तीभाव  – आणि आपल्या आईच्या ठिकाणची एक छोटी व्हिडिओ हे सगळं मिळून ...

#ASD | Aai Saptashrungi Devi | भक्तीचा पुन्हा एकदा शुभारंभ 🙏 | Re-Start Devotional Journey

Image
जय माता दी 🙏 नमस्कार मित्रांनो मी राज रघुवीर जोशी, आई सप्तशृंगी देवीचा एक साधा भक्त. सन 2022 साली, आई सप्तशृंगी देवीच्या कृपा आशीर्वादाने “आई सप्तशृंगी देवी” हे YouTube चॅनेल सुरू केले. या चॅनेलच्या माध्यमातून आपल्या पर्यंत आईचे दैनंदिन दर्शन, सप्तशृंगगडाशी संबंधित माहिती, आणि आईच्या भाविकांसाठी उपयुक्त असे ७० पेक्षा अधिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 🌸 थोडा थांबा… पण भक्ती कायम.... मित्रांनो काही कारणांमुळे गेल्या काही काळात आपल्या आईची माहिती, दर्शन व सप्तशृंग गडावरील कोणतीही माहिती तथा चॅनल वर कोणताही व्हिडिओ अपलोड करता आले नाही तथा झाले नाही. मात्र, आईवरील श्रद्धा आणि भक्तीचा प्रवास कधीच थांबलेला नव्हता. आज, आई सप्तशृंगी देवीच्या कृपेने, हा भक्तीमय प्रवास पुन्हा नव्या उत्साहाने सुरू करत आहे. 🔱 या चॅनेलवर तुम्हाला काय मिळेल? या YouTube चॅनल, ब्लॉगवर (Blog) टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम पेज व फेसबुक पेज यासारख्या विविध माध्यमाच्या वतीने तुम्हाला नियमितपणे श्री भगवती राजराजेश्वरी, त्रिगुणात्मक स्वरूपिनी, आईसाहेब आई सप्तशृंगी देवी देवीचे दर्शन, सप्तशृ...