#ASD | POV: जेव्हा शब्द थांबतात आणि श्रद्धा बोलू लागते | सप्तशृंगगडावर पोहोचल्यावरचं समाधान...
POV : आई सप्तशृंगीच्या दर्शनाचा अविस्मरणीय क्षण... नमस्कार मित्रांनो मी राज रघुवीर जोशी तुमचे स्वागत करतो आजच्या विशेष व एक छोट्या व्हिडिओच्या माहितीचे काही क्षण आपण आज पाहणार आहोत. आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांतता देणारे क्षण फारच दुर्मिळ झाले आहेत. अशा वेळी केवळ १५ सेकंदांचा एक छोटासा POV व्हिडिओ देखील मनाला गहिवरून टाकतो मनाला स्पर्श करून जातो. हा व्हिडिओ पाहताना असे वाटते, जणू आपण स्वतःच त्या क्षणी आई सप्तशृंगी देवीच्या आणि तिच्या पावन नगरीत / सान्निध्यात उभे आहोत. POV म्हणजे नेमकं काय? POV (Point of View) म्हणजे एखादा अनुभव तुमच्या नजरेतून दाखवणे. प्रेक्षक फक्त व्हिडिओ पाहत नाही, तर तो क्षण स्वतः अनुभवतो. म्हणूनच POV व्हिडिओ आज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहेत. १५ सेकंद… पण अनुभव अमर हा व्हिडिओ जरी फक्त १५ सेकंदांचा असला, तरी त्यात वापरलेल्या छोट्या क्लिप्स खूप काही सांगून जातात. – डोंगरातील शांत वातावरण – नैसर्गी सौंदर्य – मंदिराचा पवित्र परिसर – श्री भगवतीचे दर्शन – मनाला स्पर्श करणारा भक्तीभाव – आणि आपल्या आईच्या ठिकाणची एक छोटी व्हिडिओ हे सगळं मिळून ...